दळणवळणबरोबरच रेल्वेनं नातं जोडलं आहे. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं. वाफेच्या इंजिनाच्या गाडीपासून वेगवान मेट्रो ते बुलेट ट्रेन असा जगभरातला रेल्वे उभारणीचा इतिहास जवळपास दोनशे वर्षांचा आहे. रेल्वेची निर्मिती, रेल्वेचे रूळ, उभे राहिलेले पूल, स्टेशन्स, प्लॅटफॉर्म बांधणी, डब्यांची बांधणी, अंतर्गत व्यवस्था आणि सोई-सुविधा ही सगळी वाटचाल थक्क करणारी आहे. हा प्रवास रेल्वेरुळांसारखा अफाट आहे.